जळगाव;- शहरातील पोलन पेठ परिसरातून २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीला आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर अर्जून कोळी (वय-१७) रा. ममुराबाद ता. जि.जळगाव हा तरूण पोलन पेठ मधील अग्रवाल फॅन्सी फटाक्याच्या दुकानावर कामाला आहे. कामावर ये-जा करण्यासाठी (एमएच १९ बीडब्ल्यू ६४२) क्रमांकाची दुचाकी आहे. त्याने दुचाकी दुकानाच्या समोर पार्किंग करून लावली होती.घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ मयूर आला असता त्याला त्याची दुचाकी पार्किंगला लावलेली दिसून आली नाही. पोलन पेठ परिसरात दुचाकीचा शोध घेवून मिळून न आल्याने मयूरने शहर पोलीस ठाणे गाठले. मयूर कोळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.








