जळगाव ;- ना नफा ना तोटा तत्त्वावर ३० बेडचे सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संथा संचालित सरदार वल्लभभाई पटेल क्वारंटाइन सेंटर शिवसेना, युवाशक्ति फाउंडेशन व युवा विकास फाउंडेशनच्या मदतीने सुरू करण्यात आले. या क्वारंटाइन सेंटरचे उद््घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ. ए. जी. भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, केमिस्ट असोसिएशनचे सुनील भंगाळे, सचिव अनिल झंवर, डॉ. स्नेहल फेगडे, किरण पाटील आदी उपस्थित होते. क्वारंटाइन सेंटरसाठी केमिस्ट असोसिएशनचे सहसचिव रूपेश चौधरी, दिनेश मालू, इरफान सालार, युवाशक्तीचे विराज कावडिया, अमित जगताप, ललित महाजन, महेंद्र पाटील, प्रा. सुरेश अत्तरदे, राजेश वारके, प्रा. योगेश महाजन, प्रा. नीलेश पाटील, राजेश काळे आदींनी सहकार्य केले.








