• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाच्या या वातावरणात राजकारण करणं योग्य नाही – चंद्रकांत पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार लवकरच पडणार असा दावा राज्यातील प्रमुख विरोध पक्ष असलेल्या भाजपकडून वारंवार केला जात आहे. अशात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना एक खंत व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सत्तेत न आल्याची सल बोलून दाखवली आहे. जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड सेंटरला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कोविडचा काळ आहे. कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. ‘रेमडेसिवीरचा विषय आता नियंत्रणात आहे. ऑक्सिजनचा विषयही नियंत्रणात येत आहे. कोरोनाच्या या वातावरणात राजकारण करणं योग्य नाही. मात्र, कोविड आहे काय हवं ते करून घ्या’, असंही करून चालणार नाही.

‘शेवटी लोकांनी तुम्हाला अंकूश शक्ती म्हणून निवडून दिलं आहे. आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिलं होतं. विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो. विरोधकांची भूमिका ही अंकूश शक्ती असते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आम्ही खपवून घेणार नाही’, असं पाटील म्हणाले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरील धाड हा सीबीआयचा दुरुपयोग असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. सीबीआयचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला जात आहे. ‘हाय कोर्टानेच या प्रकरणाची चौकशी लावली आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? असेल तर मग उद्याच कोर्टात अवमान याचिका दाखल करतो, असा इशारा देतानाच लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरू आहे’.

‘कोर्टाने केवल चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. त्यात शेवटच्या पॅऱ्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आहेत. यात सत्तेचा दुरुपयोग आला कुठे?’, असा सवाल त्यांनी केला आहे.

‘सुप्रीम कोर्टाने मोदींना फटकारले की बघा कोर्टाने केंद्राला फटकारले, असं संजय राऊत सांगतात, पण महाराष्ट्राला फटकारले की ते मॅनेज असल्याचा आरोप ते करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. पश्चिम बंगालमध्ये २०० हून अधिक जागा मिळणार आणि पंढरपूर जिंकणार’,असा दावाही त्यांनी केला.

‘आमचा विजय झाला की ईव्हीएम घोटाळा असतो. त्यांचा विजय झाला की सारं काही अलबेल असतं, असा चिमटाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना काढला. केजरीवाल- मोदी वादावरून लक्ष हटवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्याच्या वृत्तावर अशी टीका करणाऱ्यांची कीव येते’, असे ते म्हणाले आहेत.
०००००


 

 

Previous Post

मांसविक्री बंद असतानाही विक्री केल्याप्रकरणी ९ जणांकडून दंड वसूल

Next Post

भाजप वैद्यकीय आघाडी ग्रामीणची जिल्हा कार्यकारणी जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजप वैद्यकीय आघाडी ग्रामीणची जिल्हा कार्यकारणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon