नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यावरून आता भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख आहे पण देशमुख यांचा धनी कोण असा सवाल त्यानी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, ‘मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार CBI ने या वसूलीसरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केले. हे तर जगजाहिर झाले आहे की, सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख आहे आता फक्त एकच प्रश्न देशमुखांचा धनी_कोण?’ असा सवाल पडळकर यांनी केला. यावेळी त्यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर दिसत आहे.
दरम्यान, एका अनिलवर कारवाई पुरेशी नाही. खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे .खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच असे अतुल भातखलकर यांनी म्हंटल.







