• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी लवकरात लवकर पावले उचलू – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, अँटनी ब्लिंकेन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2021
in भारत, विश्व
0

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसने भारतात हाहाकार माजवला आहे. असे असतानाच भारताला मदत न करण्यावरून वादात सापडलेल्या अमेरिकेतील बायडेन सरकारने पहिल्यांदाच तोंड उघडले आहे. यासंदर्भात बोलताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, अँटनी ब्लिंकेन म्हणाले, त्यांच्या संवेदना भारतीयांसोबत आहेत. ते म्हणाले आम्ही भारत सरकारसोबत एकत्रितपणे काम करत आहोत. तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण सल्लागार जेक सुलिवन यांनीही भारताप्रति सहानुभूती दाखवत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

अँटनी ब्लिंकेन म्हणाले, भारतातील कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता, आम्ही आणखी शक्तीनिशी भारतासोबत उभे आहोत. याबाबतीत आम्ही आपला भागीदार असलेल्या भारत सरकारसोबत एकत्रितपणे काम करत आहोत. आम्ही भारत आणि भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी लवकरात लवकर पावले उचलू.

अमेरिकन राष्ट्रीय सरक्षण सल्लागार जेक सुलिवन यांनी म्हटले आहे, की भारतातील कोरोनाचा प्रकोपामुळे अमेरिका अत्यंत चिंतित आहे. आम्ही आपला मित्र आणि सहकारी असलेल्या भारताला अधिक पुरवठा आणि समर्थन देण्यासाठी चोवीस तास काम करत आहोत.

अमेरिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर, बायडेन प्रशासन कोरोना लशीच्या निर्यातीत वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातीवर घातलेली बंदी हटवू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांच्यासोबत लशीच्या कच्च्या मालासंदर्भात चर्चा केली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनीही अमेरिकेचे उप सचिव वेंडी शेरमन यांच्यासोबत ही बंदी हटविण्यासंदर्भात चर्चा केली आहे.

सध्या भारतात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हाहाकार माजला आहे. यातच, रशियाने भारताला कोरोना संकटाचा सामना करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रशियाकडून ऑक्सीजन काँसंट्रेटर्स आणि टँक विकत घेण्याचा विचार करत आहे. जर हा प्लॅन आमलात आलाच तर सध्या ऑक्सिजन संकटाचा सामना करत असलेल्या भारताला मोठा दिलासा मिळेल.

तत्पूर्वी, चीननेही भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी भारताला मेडिकल सप्लाय करण्यास तयार आहोत, असे चीनने गुरुवारी म्हटले होते. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे भारतातील मेडिकल ढांचा कमकूवत होऊ लागला आहे. भारतातील महामारीच्या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबिन यांनी म्हटले होते, की चीन मदतीसाठी तयार आहे. कोरोना व्हायरस हा मानवतेचा शत्रू आहे. त्याचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्रित येण्याची आवश्यकता आहे.

पाकिस्तानातील एधी फाउंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी असणाऱ्या फैजल एधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले असल्याची माहिती मिळाली आहे. हे पत्र सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे. फैजल एधी, एधी फाऊण्डेशनचा कार्यकारी ट्रस्टी स्वत: माझ्या संस्थेतील एक टीम भारतामध्ये मदतीसाठी पाठवू इच्छितो. आताची परिस्थिती गंभीर आहे, याची आम्हाला जाणीव असल्यानेच आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, असे या पत्रात म्हटले आहे.

भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा संदेश ट्वीट केला आहे. “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील नागरिकांना मी एकत्र राहण्याचा संदेश देत आहे. संघर्षाच्या या काळात फ्रान्स तुमच्यासोबत उभा आहे. या महासाथीनं कोणालाही सोडलं नाही. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत,” असा विश्वास इमॅन्युअल मॅक्राँ यांनी दिला आहे.

“भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया भारतातील आपल्या मित्रांसाठी उभा आहे. भारत किती खंबीर आहे हे आम्हाला माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी या जागतिक आव्हानावर एकत्र काम करत राहू,” असं स्कॉट मॉरिसन म्हणाले.


 

 

Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर दोन गंभीर

Next Post

काँग्रेस कार्यकर्त्यांनो, जनतेला मदत करा, हाच काँग्रेसचा धर्म आहे; राहुल गांधींचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काँग्रेस कार्यकर्त्यांनो, जनतेला मदत करा, हाच काँग्रेसचा धर्म आहे; राहुल गांधींचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon