मुंबई(वृत्तसंस्था) ;- अँटालिया स्फोटक प्रकरण आणि उद्योजक मनसुख हिरेन संशयास्पद मृत्युप्रकरणातील ( Mansukh Hiren death) प्रमुख आरोपी सचिन वाझेयांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आगामी 5 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाझे यांच्यासोबतच निलंबित पोलीस अधिकारी रियाझ काझी यांनासुद्धा 5 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी वाझे यांनी केलेल्या एकूण तीन मागण्यांपैकी दोन मागण्या न्यायालयाने फेटाळल्या आहेत. आज (23 एप्रिल) एनआयएच्या विशेष न्यायालयात या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने वरील निर्णय दिला.








