जळगाव;- गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स गॅ्रज्युएट्ससाठी ‘करियर पर्याय व उपलब्ध संधी’ या विषयावर १९ एप्रिल रोजी एक दिवसीय संवादाचे आयोजन करण्यात आले होते, ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
गोदावरी अभियांत्रिकीतील विद्युत आण्विक आणि दुरसंचार विभागातर्फे आयोजित ऑनलाईन तज्ञ संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय एच पाटील, उपप्राचार्य प्रा.प्रविण फालक यांनी केले. अॅकेडमिक डीन व ई अॅण्ड टीसी विभागप्रमुख प्रा.हेमंत इंगळे यांनी स्वागतपर भाषण केले. याप्रसंगी मार्गदर्शक प्रमुख फिलीप्स इंडिया लिमिटेड, पुणे येथील तज्ञ संवादक रेंजिथ सी.व्ही. ह्यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.विजय द.चौधरी यांनी तज्ञांची ओळख करुन दिली.
याप्रसंगी रेंजिथ सी.व्ही यांनी इलेक्ट्रॉनिक्स, संगणक व विद्युत अभियांत्रिकी सहभागार्थींना करिअर नियोजन, उच्च शिक्षण (भारत व परदेशात) उपलब्ध संधी, इलेक्ट्रॉनिक्स संबंधित संशोधन व उद्योग (स्टार्ट अप) यासाठी हार्डवेअर व सॉफ्टवेअरमध्ये लागणारे विविधअंगी कौशल्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उद्योग जगतातले विकास चक्र स्पष्ट करताना त्यांनी नविन संकल्पनेपासून ते अंतीम प्रोटोटाईप तयार होईपर्यंतचा प्रवास समजून सांगितला. उद्योगांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सची वेगवेगळी भूमिका, व्हीएलएसआय डिझाईन व इनबेडेड सिस्टीम इंजिनिअर यांना डिझाईन आणि डेव्हलपमेंट साठी लागणारे प्लॅटफॉर्म व कौशल्य तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट केले. यानंतर समन्वयक प्रा.विजय डी चौधरी यांनी तज्ञ संवादक रेंजिथ यांचे उत्तम मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.
कार्यक्रमासाठी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा.डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पाटील, उपप्राचार्य प्रा.प्रविण फालक, प्रशासकीय अधिकारी प्रा.ईश्वर जाधव तसेच अॅकेडमिक डीन प्रा.हेमंत इंगळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा.एम.एच.पाटील, प्रा.व्ही.व्ही.चौधरी, प्रा.योगेश बिरारी यांच्यासह शिक्षकवृदांचे सहकार्य लाभले.








