• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिहारमध्ये AIIMS मधील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांना कोरोनाची बाधा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2021
in भारत
0

पाटणा (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूने देशासह जगात थैमान घातले आहे. भारतात अनेक कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या २ लाखाहून अधिक सापडत आहे. तर अनेक रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे, यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच रुग्णांना बरे करणारे देवदूत डॉक्टर देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. पाटणा येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS ) कोरोनाने कहर केलाय. तेथे तब्बल ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची धक्कदायक माहिती समोर आलीय.

पाटणा येथील एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. तसेच, बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, परंतु, आता ती पुढे ढकलण्यात आली. साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुका टाळल्या आहेत. आणि १५ दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि निर्णय घेतला जाणार आहे.

बिहारच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १० हजार ४५० नवे रुग्ण सापडले आहेत. तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अर्थात दर तासाला २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, बिहार राज्यात नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण कमी होत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वारंवार कमी होत आहे. बिहारमध्ये कोरोनाचे आतापर्यंत ३,४२,०५९ रुग्ण आढळले आहेत तर १,८४१ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या मंगळवारपर्यंत कोरोनाचे ५६,३५४ रुग्ण उपचारखाली आहेत. तर पाटणा येथील रुग्णालयांमधील मागणीनुसार फक्त २५ टक्के ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना संक्रमित रुग्णांचे जीवन धोक्यात आले आहेत.

दरम्यान, देशभरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून एकूण रुग्णसंख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा आता पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तर दोन दिवसांपूर्वी देशात आयसीयू बेडवर १.९३ टक्के रुग्ण होते. आता ही संख्या कमी होऊन १.७५ टक्के इतकी झाली आहे. २ दिवसांपूर्वी व्हेंटिलेटवर ०.४० टक्के रुग्ण होते. आता ही संख्या तेवढीच आहे. सोमवारी देशात ऑक्सिजन सपोर्टवर ४.२९ टक्के रुग्ण होते. ते आता ४.०३ टक्के इतके आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.


 

 

Previous Post

आता विनाकारण प्रवास केल्यास दहा हजारांचा दंड- जिल्हाधिकारी

Next Post

सिलिंडर ‘असा’ करा बुक अन् मिळवा 800 रुपयांचा कॅशबॅक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सिलिंडर 'असा' करा बुक अन् मिळवा 800 रुपयांचा कॅशबॅक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
Uncategorized

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

July 28, 2026
बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात
1xbet russia

बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात

July 28, 2026
बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात
1xbet russia

बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon