• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गजा मारणे प्रकरणात पोलिसांकडून माजी खासदार संजय काकडेंना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गजा मारणेच्या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या गाड्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संजय काकडे यांची वाहने गजा मारणेच्या रॅलीत होती अशी माहिती आहे. याच रॅलीच्या संदर्भात संजय काकडे यांना अटक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संजय काकडे यांना आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. शिवाजी नगर कोर्टात हजर केल्यानंतर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अधिक माहिती देतील, असं सांगण्यात येत आहे.

गजा उर्फ गजानन मारणे हे पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा मारणे याने टोल न भरणे तसंच दहशत पसरवणे तसं वातावरण तयार करणे, असे गुन्हे मिरवणुकीनंतर गजा मारणेवर दाखल झाले. एकंदरित ही मिरवणूक त्याला चांगलीच महागात पडली.

संजय काकडे हे भाजप पुरस्कृत राज्यसभेचे खासदार होते. एप्रिल 2014 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ते भाजपच्या मदतीने विजयी झाले होते. काकडे हे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आहेत. ‘संजय काकडे ग्रुप’ असे त्यांच्या बांधकाम कंपनीचे नाव आहे. आपल्या ‘राजकीय भविष्यवाणी’मुळे ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. संजय काकडे यांचे सर्वपक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत.


 

 

Previous Post

यूपीत १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार

Next Post

लोकप्रियतेसाठी माजी आमदारानं लावले ऑक्सिजन सिलेंडरवर स्वत:चे फोटो

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लोकप्रियतेसाठी माजी आमदारानं लावले ऑक्सिजन सिलेंडरवर स्वत:चे फोटो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon