मुंबई (वृत्तसंस्था) – ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचा सोसायटीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हाणून येथील परिसर सील करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून रविवारी कोरोनाचे नवे २६ रुग्ण सापडले आहेत.राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६६१ वर पोहचली आहे दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अंकिता लोखंडे ज्या कोम्पल्समध्ये राहते तेथे एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. हा कोरोनाबाधित व्यक्ती स्पेनवरून भारतात परतला होता. सदरील व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसून आल्यनानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.