• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ड्रीम्स मॉलमध्ये आगीत होरपळलेल्या कोरोना मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांच्या मृत्यूची भीषण दुर्घटना ताजी असतानाच, गुरुवारी मध्यरात्री भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये कोरोना उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत ९ रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला, तर पाच रुग्ण गंभीर जखमी आहेत. शिवाय दोन मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेची गंभीर दखल घेतली असून, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत त्यांनी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. या रुग्णालयात ७८ रुग्ण उपचार घेत होते. ६७ रुग्णांची सुखरूप सुटका करण्यात आली. धुरामुळे श्वास गुदमरून ९ रुग्णांचा मृत्यू ओढवला. भांडुप पश्चिमेकडे असलेल्या तीन मजली ड्रीम्स मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज या रुग्णालयास गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता आग लागली.

सदर घटनेवरुन भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले…ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं, अशी टीका भाजपाने ट्विटरद्वारे केली आहे.

तत्पूर्वी, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरुवातीला तीन फायर इंजिन आणि दोन जंबो टँकर यांच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू केले. शुक्रवारी पहाटे आगीने पुन्हा जोर पकडला. मॉलमधील १०० ते २०० मीटर परिसरातील दुकानांना आग लागून इलेक्ट्रिक साहित्य, लाकडाचे फर्निचर, इलेक्ट्रिक वायरिंग आणि रुग्णालयातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले.

आग विझविण्याचे काम सुरू असतानाच मॉलच्या तिन्ही मजल्यांवर मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. आग विझवण्यासाठी रोबो २०, मोटार पंप, १५ जंबो टँकर, ३ वॉटर टँकर इत्यादींसह इतर अत्याधुनिक साहित्याची मदत घेण्यात आली. आगी सोबतच धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर उठल्याने आग विझविण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून, याबाबत सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत. सनराईज रुग्णालयाला २८ फेब्रुवारी २०२१ला बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ३१ मार्च २०२१पर्यंत रुग्णालय बंद करू, असे रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिका प्रशासनाला सांगितले होते. त्यानंतर कोविडची रुग्णसंख्या वाढल्याने हे रुग्णालय पुन्हा सुरू झाले होते. – किशोरी पेडणेकर, महापौर

मॉलच्या गच्चीवर काही लोक अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. गच्चीवरील लोकांना सुरक्षित बाहेर काढत असतानाच रुग्णालयातील रुग्णांना अत्यंत सुरक्षित बाहेर काढण्याचे मोठे आव्हान अग्निशमन दलासमोर होते. अग्निशमन दलाच्या मोठ्या शिडीच्या मदतीने येथे अडकलेल्या सुमारे ७१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा आणि रुग्णांचा समावेश आहे.

राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत, त्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तपासणी तत्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत. ही घटना दुर्दैवी आहे. यासंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


 

 

Previous Post

बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मीही सहभागी होतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next Post

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनात आर्टिस्ट विजय जैन यांच्या चित्राची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनात आर्टिस्ट विजय जैन यांच्या चित्राची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon