दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने दिल्लीत सुद्धा कहर केला आहे. दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 384 वर पोहचला आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासात दिल्लीत 91 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या 384 रुग्णांपैकी 259 रुग्ण मरजकमध्ये सहभागी असणारे आहेत. तर 58 रुग्ण विदेशातून दिल्लीत आले असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.