मुंबई (वृत्तसंस्था) – देशभरासह राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दर तासाला वाढ होत आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 490 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 67 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या 67 रुग्णांमधील एकट्या मुंबईतील 43 रुग्ण आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 278 वर पोहचली आहे. महाराष्ट्र कोरोनाग्रस्त रुग्ण – 490, मृत्यू – 26, बरे झालेले रुग्ण – 42, देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. देशात बाधित रुग्णांची संख्या 2547 वर पोहचली असून आतापर्यंत 62 जणांचा या आजाराने बळी गेला आहे.
भारत, कोरोनाग्रस्त रुग्ण – 2547, मृत्यू – 62, बरे झालेले रुग्ण – 162, संपुर्ण जगात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आतापर्यंत जगात 1,055,059 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 55,796 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. संपुर्ण जग, कोरोनाग्रस्त रुग्ण – 1,055,059, मृत्यू – 55,796, बरे झालेले रुग्ण – 224,683, कोरोना व्हायरसबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अशा सुचना वारंवार दिल्या असतांना देखील काही टवाळखोर नागरिक हुल्लडबाजी करण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत. तसेच संयम आणि शिस्त ठेवून कोरोनाशी लढा दिला तर आपण नक्कीच कोरोनासोबतची लढाई जिंकू शकतो असं म्हंटल आहे. मात्र वारंवार सुचना देऊन सुद्धा नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करणे सुरू केले आहे.