ललवाणींसह सात जणांवर श्रीरामपूर पोलीसांत गुन्हा दाखल

जामनेर (प्रतिनिधी) – येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलीसांत त्यांच्यासह सात जणांवर बाल लैंगीक कायद्याच्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथे दाखल झाला असून शून्य क्रमांकाने जामनेर पोलीस स्थानकात वर्ग झाला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील माहेर असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे लग्न जामनेर येथील वृषभ विकास ललवाणी यांच्यांशी झाला. मुलगी अल्पवयीन असतानाही बळजबरीने विवाह लावून देण्यात आला. यासाठी पारस ललवाणी यांच्यांसह सुनील कोचर, विकास ललवाणी,भावेश ललवाणी, भावना ललवाणी, चंदुलाल सुधालाल कोठारी यांनी मदत केल्याने त्यांच्यावर श्रीरामपूर पोलीसांत बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुरनं 0068 /21 अन्वये भादंवि कलम 354 अ, 11 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.
पारस ललवाणी सोबत संबध ठेवण्यासाठी सासरच्यांकडून मारहाण
पिडीत मुलीचे वृषभ ललवाणी यांच्याशी विवाह झाला असतानाही पारस ललवाणी घरी येऊन पिडीत मुलीशी अंगलठ करत होता घडलेला प्रकार सासरच्यांना सांगितले असता तुला पारस ललवाणी यांच्यांशी संबंध ठेवावे लागेल असे सांगून सासरच्यांकडून मारहाण करण्यात येत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सावत्र बाप मानलेला मामानेही छेळले
पिडीत तरुणीचे सावत्र बाप चंदुलाल कोठारी आणि मानलेले मामा सुनील कोचर दोघांनाही पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने विवाह योग्य नसल्याचे तिची आई सांगत होती मात्र घरात आईला व स्वतः मारहाण बाप करीत असल्याचेही फिर्यादीत नमुद आहे. शिवाय मानलेला मामा सुनील कोचर याचेही यासाठी सहकार्य असल्याचे फिर्याद पोलीसांत देण्यात आली आहे.







