वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – सातपुड्यातील देवझीरी या वनक्षेत्रात वनाधिकारी कर्मचाऱ्यांना खुले आव्हान देत वनविभागाच्या हद्दीतील उभ्या झाडांची कत्तल करून मज्जाव करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करीत आठ कर्मचारी जखमी झाले. यावेळी जमाव पांगविण्यासाठी हवेत गोळीबाराच्या दोन फैरी झाडल्या. याबाबत ३० ते ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वनसुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, २२ रोजी संध्याकाळी ५ वाजता रविंद्र रेवसिंग बारेला यास भागडया भिलाला रा मोहनपुरा, ता.वरला, जि. बडवाणी याने वनकर्मचाऱ्यांना लाकडे तोडू दिले नाही जंगलात पळविले म्हणून ” बघा आम्ही काय करतो? असा दम दिला.
१२ : ३० ते १ वाजेच्या दरम्यान देवझिरी वन विभागाचे मालकीचे पाटीकेम्प परिसरात/वासुपॉइट ते पाटी कॅम्पचे मध्यभागी देवझिरी जंगलात ३० ते ३५ अनोळखी इसमांनी वनविभागाचे मालकीचे २५ ते ३० झाडे तोडत असतांना त्यांना झाडे तोडू नका असे सांगुन प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी यांनी गैर कायदयाची मंडळी जमून फिर्यादी व साक्षीदार हे शासकिय काम करीत असतांना त्यांनी शासकिय काम करु नये करीता त्यांच्यांवर गोफणीने दगड मारुन सोबत एसआरपीएफचे जवान व वन विभागाचे कर्मचारी व रोजंदारीचे कर्मचारी यांना दुखापत करुन शे.आसीफ शे.अकबर यांची ढालीवर कु-हाड मारुन ढालीचे नुकसान करुन जमावाला पांगविण्यासाठी दोन प्लॅस्टिक गोळयांचे फायर केल्यानंतर एक रिकामे केस घटनास्थळी मिळून आले असून एक रिकामे केस हे गहाळ झालेले आहे. म्हणून आडवद पोलीस ठाण्यात वनक्षेत्रपाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ३० ते ३५ इसमांविरुध्द भादविक ३५३,३३२,१४३,१४७,१४८,१४९,४२७ ५०६, मुपो एक्ट १३५ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







