भडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

भडगाव (प्रतिनिधी) – आईसह दोन मुलांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची खळबळजनक घटना समोरआली आहे. ही घटना भडगाव तालुक्यातील कनाशी येथे घडली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत अज्ञाप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही
याबाबत माहिती असी की आई गायत्री दिनेश पाटील (वय 43), तिचा मुलगा खुशवंत दिनेश पाटील (वय 10) मुलगी भैरवी दिनेश पाटील (वय 8) हे तिघे भडगाव तालुक्यातील कनाशी शिवारात असलेल्या त्यांच्या शेतात गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या घरी परत आल्या नाही. त्यामुळे नातेवाईकांनी गावात त्यांची शोधाशोध केली असताना त्यांच्या शेतातील विहिरीत हे तिघे तरंगताना दिसून आले. त्यानंतर त्यांना तात्काळ बाहेर काढून भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कनाशी शिवारात ही घटना घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.







