जळगाव ( प्रतिनिधी ) ;राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील यांनी आपल्या पदाचा ३ वर्षा पेक्षा जास्त कार्यकाल पूर्ण झालेला असल्याने व इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा महिला प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांच्या कडे ई-मेल द्वारे पाठवण्यात आला आहे .इतर महिला सक्षम कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा कल्पनाताई पाटील यांनी व्यक्त केली .








