• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांनी त्या महिलेचं म्हणणं राहुल गांधींपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं नाही

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 18, 2021
in भारत
0

पुद्दुचेरी (वृत्तसंस्था) – काँग्रेस नेते राहुल गांधींकडे मदत न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या महिलेच्या शब्दांचं चुकीचं भाषांतर केल्यानं भारतीय जनता पक्षानं पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चक्रीवादळादरम्यान मदत न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या महिलेचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं नाही. उलट संबंधित महिला आपलं कौतुक करत असल्याचं नारायणसामी यांनी राहुल यांना सांगितलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुद्दुचेरीत लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी दोन दिवसांच्या पुद्दुचेरी दौऱ्यावर आहेत. काल राहुल गांधींनी मच्छिमारांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री नारायणसामी राहुल गांधींसोबत होते. यावेळी सोलाई नगरच्या एका मच्छिमार महिलेनं नारायणसामी यांची तक्रार राहुल यांच्याकडे केली. आमच्या भागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. मात्र तरीही मुख्यमंत्री फिरकले नाहीत, अशी तक्रार महिलेनं केली.

तक्रारदार महिला स्थानिक भाषेत बोलत होती. तिचं म्हणणं राहुल गांधींना समजावून सांगताना मुख्यमंत्री नारायणसामींनी चुकीचं भाषांतर केल्याचा दावा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केला आहे. ‘कोणीही आम्हाला मदत केली नाही. त्यांनीही (मुख्यमंत्री नारायणसामी) आमच्या भागाला भेट दिली नाही,’ असं मच्छिमार महिला म्हणाली. याचं भाषांतर करताना मुख्यमंत्र्यांनी लबाडी केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. ‘निवार चक्रीवादळ आलं असताना मी त्या भागाला भेट दिली. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली, असं तिला सांगायचं आहे,’ असं नारायणसामींनी राहुल गांधींना सांगितलं.

राहुल गांधींना चुकीचं भाषांतर करून सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्याना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘मी काहीही चुकीचं सांगितलं नाही. तुम्ही असे प्रश्न का विचारता?’, असा उलट प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला. यावरून भाजपचे राज्यसभेचे खासदार राजीव चंद्रशेखर यांनी जोरदार टीका केली. ‘राहुल यांच्या पुद्दुचेरी दौऱ्यातला आणखी एक खोटारडेपणा. वृद्ध महिला मुख्यमंत्र्यांना चक्रीवादळग्रस्त भागाकडे पाठ फिरवल्याचं सांगते आणि राहुल यांचे मुख्यमंत्री त्यांना मी त्यांच्या भागात जाऊन मदत केल्याचं चुकीचं भाषांतर ऐकवतात,’ असं चंद्रशेखर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


 

 

Previous Post

पूजा चव्हाणप्रकरणी पुणे पोलिसांनी अरुण राठोडला घेतले ताब्यात

Next Post

आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? – नाना पटोले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? - नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७३ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
क्राईम

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७३ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

October 6, 2026
जळगावात तरुणीवर अत्याचाराचा आरोप; तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
क्राईम

जळगावात तरुणीवर अत्याचाराचा आरोप; तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

October 6, 2026
गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन
जैन कंपनी

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 6, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांच्या एसटीसाठी जळगावच्या कॉम्प्युटर असोसिएशनचा पुढाकार!
खान्देश

आदिवासी विद्यार्थ्यांच्या एसटीसाठी जळगावच्या कॉम्प्युटर असोसिएशनचा पुढाकार!

October 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७३ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७३ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

October 6, 2026
जळगावात तरुणीवर अत्याचाराचा आरोप; तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

जळगावात तरुणीवर अत्याचाराचा आरोप; तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

October 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon