जळगाव ::यावल तालुक्यातील किनगाव जवळ झालेल्या अपघातात १३ मजूरांसह २ बालकांचा अशा १५ जणांचा मृत्यू झाला आहे.घटनेने अभोडा, विवरे, केर्हाळे व रावेर शहरासह तालूक्यात एकच शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची दखल घेत, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करुन मृतांच्या वारसांना सरकारकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींवरील उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली असून संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.








