जळगाव ;– शहरातील गंधर्व कॉलनीमध्ये एक बंद घर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्याना नागरिकांच्या सतर्कतेने रफ़ूचक्कर ‘ होऊन पोबारा करण्याची वेळ आह्ल्याची घटना उघडकीस आली आहे .
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , गंधर्व कॉलनीतील व्ही. एम. पाटील हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असल्याने ही संधी साधुन चोरट्यांनी मंगळवारी रात्री १२.३० वाजता त्यांच्या घराच्या मागच्या चॅनलगेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोखंडी गेटचे कुलूप तोडत असताना आवाज झाल्यामुळे शेजारी राहणारे लोक झोपेतून जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन लाईट सुरू केल्यामुळे चोरट्यांनी पाटील यांच्या अंगणातून पलायन केले . मात्र चोरट्यांनी याच परिसरातील सुरेश विश्वनाथ अकोले यांचे बंद घर फोडले. अकोले दाम्पत्य बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांचेही घर बंद होते. चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले. परंतु, त्यांच्याकाहीच हाती लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली .
==============================







