जळगाव :- जळगाव शहराच्या एमआयडीसी परिसरातील ममता बेकरीजवळ असणाऱ्या एका भंगार वस्तूच्या गोडाऊनला आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली . या आगीत भंगार मालाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेला माल जाळून खाक झाला . यात नेमके कीर्तीचे नुकसान आणि आग कशामुळे लागू शकली नाही याचे कारण स्पष्ट झाले नाही . आग मनपाच्या अग्निशामक दलाच्या बंबांनी आटोक्यात आणली . या आगीत गोडाऊनमधील पाण्याच्या टाक्या, बाथरुमसाठी लागणारे चिनी मातीचे भांडे, प्लास्टीकच्या जुन्या बाटल्या अशा वस्तू जळून खाक झाल्या.
शाहीद शेख मुस्ताक शेख (वय-२८) रा. मास्टर कॉलनी यांचे त्यांचे नशिराबाद येथील आठवडे बाजारात स्टार हार्डवेअरचे दुकान आहे.
या घटनेची माहीती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्याकर्मचाऱयांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीसांनी धाव घेतली असून पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.