यावल ;- जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व पंचायत समितीतर्फे यलो लाइन मोहीमेअंतर्गत आदर्श विद्यालय दहिगाव या शाळेची तंबाखूमुक्त शाळा म्हणून निवड केली आहे. शाळेचा परिसर तंबाखू प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आला आहे. विविध स्तरावर तंबाखुमुक्तीबाबत जनजागृती, सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणामध्ये आदर्श विद्यालयाची निवड झाली. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर तंबाखू सेवन, विक्री व खरेदी प्रतिबंधीत क्षेत्राची सूचना लावण्यात आली आहे. सावखेडासिम आरोग्य केंद्राच्या डॉ. नसीमा तडवी, चेअरमन सुरेश पाटील, मुख्याध्यापक एस. डी. चौधरी, पर्यवेक्षक जी. एस. पाटील, जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर उपस्थित होते.








