जळगाव ;- बीएचअार पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पुण्यात दाखल गुन्ह्यात संशयित सीए धरम सांखलाचा जामीन शुक्रवारी विशेष न्यायालयाने फेटाळल. बीएचआरच्या गुन्ह्यात महावीर जैन, विवेक ठाकरे, सुजीत वाणीयांचाही जामीन यापूर्वी फेटाळला होता. महावीर जैन याने न्यायालयाकडे वैद्यकीय कारणास्तव अर्ज केलेला आहे. त्या अनुषंगाने ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झालेला नाही. बीएचआर प्रकरणी पुण्यातील विशेष न्यायाधीश एस.एस.गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षाकडून अॅड. प्रवीण चव्हाण तर संशयितांकडून अॅड. उमेश रघुवंशी हे कामकाज पाहत आहेत.