जामनेर(प्रतिनिधी ) :- तालुक्यातील गारखेडा परिसरात लॉकडाऊन् नंतर पुन्हा अवैध धंदे जोमाने सुरू झाले आहे.या बाबतीत मात्र पोलिस प्रशासन अनभिज्ञ आहेत.
गारखेडा गावाला लागूनच पाच ते सहा खेडे आहे.या खेड्यांचा संपर्क गारखेड्याशी येत असतो.बस स्थनकात नेहमीच लोकांची वर्दळ असते.याच ठिकाणी अवैध धंदे वाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. जागो -जागी मटका बिनदिक्कत सुरू आहे.आणि मोठ्याप्रमाणात गावठी दारू चे गुत्ते सुरू आहे. शाळेच्या हाकेच्या अंतरावर , महिलांच्या शौचालयाच्या जवळ सर्रासपणे मद्य विक्री सुरू असते.त्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे.गावठी मद्या च्या फुग्या बरोबरच देशी विदेशी मद्य ही खुलेआम विकल्या जात आहे. एकलव्य या महामानवाच्या पुतळ्या जवळच ही मद्य विकल्या जाते. ड्राय डे च्या दिवशी परिसरातील मद्यापिंना सहज सर्व प्रकारचे मद्य याच ठिकाणी उपलब्ध होते. गारखेडा शिवारा च्या २/३ किमी च्या परिघात पाच ते सहा गावठी दारूच्या भट्ट्या आहेत.या भट्ट्याना लागणारे कच्चे रसायन त्यांना कुठून उपलब्ध होते? कच्चे रसायन विनासायास कोणाच्या आशीर्वादाने उपलब्ध होते? याबाबतीत ही लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
अवैध धंदे वाले निर्ढावले असून त्यांना कायद्याची भीती वाटेनाशी झाली आहे. परिसरात चालणारे अवैध धद्यांना कुणाचा आशीर्वाद? संबंधीत चालणाऱ्या धंद्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे यावरून दिसते.संबंधित पोलिस प्रशासन व दारू बंदी विभागाने याची गंभीर दखल घेऊन अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.