• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी मनसे आमदाराकडून अडीच लाखांची मदत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. देशाच्या विविध भागातून राम मंदिर बांधण्यासाठी लोक देणगी देत ​​आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनीही अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिली आहे.

राजू पाटील यांनी राम मंदिरासाठी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला आहे. राम मंदिर उभारण्याच्या या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले, असे म्हणात राजू पाटील यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे.

“आज जगभरातील सकल हिंदू समाज एकवटून अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर निर्माण निधी’ संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. काल मला पण या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले,” असे राजू पाटील ट्विटरवर म्हणाले. याचबरोबर, “गणेश मंदिर ट्रस्टी अच्युत कराडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्हाप्रमुख अण्णा गाणार, संघ कार्यकर्ते उदय कुलकर्णी, सुरेश फाटक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला आणि प्रभू श्रीराम मंदिराची छोटी प्रतिकृती भेट दिली”, असेही ट्विट राजू पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अनेक दिग्गजांनी देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाखांचा धनादेश दिला आहे. तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला पाठविला आहे. याचबरोबर, भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. या मोहिमेमध्ये मुस्लीम देखील मागे राहीलेले नाहीत. अयोध्येच्या पवित्र नगरीला धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतिक बनविण्यासाठी वासी हैदर यांच्याकडून 12 हजार, तर शाह बानो यांच्याकडून 11 हजार रुपयांची वर्गणी देण्यात आली आहे. बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महाअभियानाचे स्वागत केले होते. “राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिमांनी पुढाकार घेऊन दान केले तर नक्कीच हे दोन्ही धर्मातील एकोपा वाढविण्याचे संपूर्ण देशात प्रतिक ठरेल”, असे अन्सारी म्हणाले होते.


 

 

Previous Post

दिपक उखर्डू वाल्हे यांना सरपंच सेवा संघाचा मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान…

Next Post

अडीच वर्षीय वैदिशाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अडीच वर्षीय वैदिशाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

भुसावळ येथे रेल्वेतील भिक्षुकीच्या वादातून किन्नरावर चाकूने प्राणघातक हल्ला; चौघांवर बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 11, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
1xbet russia

दोघा भावांवर लोखंडी रॉड व काठीने प्राणघातक हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon