• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता -डॉ. ज्ञानेश्वर मुळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2021
in जळगाव
0

जळगांव :- बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि माजी सनदी अधिकारी व राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त व्याख्यान देतांना केले.

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने महासत्ता भारत: वर्तमान कि भविष्य या विषयावर श्री.मुळे यांचे व्याख्यान विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. डॉ. मुळे आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, भारत इतिहासातील एक महासत्ताच होता. केवळ आर्थिकच नव्हे तर जीवनाच्या विविध क्षेत्रात भारतीयांचे प्रभावी योगदान राहिले आहे. सद्यस्‍थितीत भारतीयांच्या कर्तृत्वाचा प्रभाव जगातील विविध देशांमध्ये दिसून येतो. क्षेत्रफळ, लोकसंख्या, सामाजिक सक्षमता या सर्व आपल्या जमेच्या बाजू आहेत. भारतीय संविधान आपणास महासत्ता कसं बनायचे याचे मार्गदर्शनही करते. स्वतंत्रता, समता, न्याय, व सुशासन या चतु:सूचीच्या आधारे भारतास वाटचाल करत रहावी लागेल. डॉ.मुळे असेही म्हणाले की, भारतास महासत्ता बनायचे असेल तर केवळ सरकारने प्रयत्न करणे गरजेचे नसून त्यासाठी देशातील जनतेने पुढाकार घेण्याची गरज आहे. डॉ.मुळे यांनी सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण, जीडीपी, शिक्षण, आरोग्यसेवा, संशोधन, साक्षरता, मनुष्य विकास, लोकसंख्या नियंत्रण, युवकांचे कार्य, देशप्रेम, कर्तव्य अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी सांगितले की, भारतास जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर सर्वोतपरी प्रयत्न होणे गरजेचे असून त्यासाठी देशातील जनता व युवक वर्ग जागृत झाला पाहिजे. तसेच शैक्षणिक क्षेत्रासोबत विविध संशोधन करुन जास्तीत जास्त पेटंट मिळविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तरच देश येणाऱ्या काळात जागतिक महासत्ता बनू शकतो. प्रास्ताविक विभागाचे प्रभारी संचालक डॉ.मनीष जोशी यांनी तर सुत्रसंचालन श्याम महाजन, परिचय विद्यार्थीनी शुभांगी केदार तर आभार सुभाष पवार यांनी मानले. या ऑनलाईन व्याख्यानासाठी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश जडे व समाधान अहिरे यांनी परीश्रम घेतले.


 

 

Previous Post

संकटग्रस्त व पिडीत महिलांसाठी वन स्टॉप सेंटरची सुविधा

Next Post

अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा – निलेश राणे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा - निलेश राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon