• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

४२ कोटींच्या कामांना मंजुरी, शहरातील विकासकामे मार्गी लागणार!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 14, 2021
in जळगाव
0

*महापौर सौ.भारती सोनवणे यांची माहिती : रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना

जळगाव, दि.१४ – शहराच्या विकासकामांसाठी शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत २०१९ मध्ये ४२ कोटींच्या कामाला मंजुरी दिली होती. काही कारणास्तव मंजूर निधीतील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मक्तेदाराला कामांचे कार्यादेश देणे रखडले होते. जळगावच्या विकासासाठी माजी मंत्री आ.गिरीष महाजन, आ.सुरेश भोळे, आ.चंदूभाई पटेल यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली.

४२ कोटींच्या कामावरील स्थगिती उठली असून मक्तेदार श्रीश्री एबीडब्ल्यू जेव्ही या मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले असून लवकरच पुढील विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत, कुलभूषण पाटील, दिलीप पोकळे, चंद्रशेखर पाटील, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, भारत सपकाळे, गजानन देशमुख, कुंदन काळे, उत्तम शिंदे, इंद्रजीत राणे आदी उपस्थित होते.

*प्रमुख रस्त्यांची कामे आणि इतर विकासकामे मार्गी लागणार*
४२ कोटींच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते आणि इतर विकासकामे मिळून जवळपास ११७ कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. शहरात एकाच वेळी अनेक कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याने अनेक रखडलेली कामे मार्गी लागणार असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली.

*स्वतंत्र खात्यात ५.१० कोटी निधी वितरित*
जळगाव मनपासाठी ४१.९५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यात शासनामार्फत प्रकल्पाच्या ७० टक्के म्हणजे २९.३६५ कोटींचे अनुदान असणार आहे. तसेच मनपाचा हिस्सा ३० टक्के म्हणजेच १२.५८५ कोटी असणार आहे. संपूर्ण योजनेच्या कामासाठी मनपाने बँकेत स्वतंत्र खाते उघडले असून मनपाने स्वतःच्या हिश्शातील ५.१० कोटींचा निधी त्या खात्यात वितरित करण्यात आला असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली.

*रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत वर्षभरात काम पूर्ण करावे*
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरातील विकासकामांसाठी ४२ कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली असून मक्तेदाराला कार्यादेश देखील निर्गमित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत शहरातील रस्त्यांची स्थिती पाहता रस्ते दुरुस्तीची कामे करणे अत्यंत आवश्यक असून रस्ते दुरुस्तीच्या कामांचा प्रथम प्राधान्यक्रमाने करणेबाबत मक्तेदाराला आदेश करावे, अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच कामे पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षे असली तरी ती वर्षभरात पूर्ण करावी अशी विनंती महापौरांनी मक्तेदाराला केली असता शासनाकडून निधीची पूर्तता जशी होईल तसे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.


 

 

Previous Post

लाचखोर तलाठ्याला १७ पर्यंत कोठडी

Next Post

यंत्रणांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यंत्रणांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

अश्लील व्हिडिओच्या रागातून तरुणाचा खून, संशयित आरोपी पती पत्नीला अटक

March 14, 2026
जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम
1xbet russia

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

March 14, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

पिंप्राळा हुडको परिसरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026
जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
1xbet russia

जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

अश्लील व्हिडिओच्या रागातून तरुणाचा खून, संशयित आरोपी पती पत्नीला अटक

March 14, 2026
जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon