जळगाव प्रतिनिधी;- येथील गेंदालाल मिल भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे . राहुल सिध्दार्थ गाढे (वय-२०) रा. गेंदालाल मिल गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, राहुल हा आपल्या आईवडील व भाऊ-बहिणीसोबत राहतो, आज सकाळी भाऊ रोहित व वडील सिध्दार्थ गाढे हे कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. तर आई बाहेर गेली होती. त्याचे घर दोन मजली असल्यामुळे राहुल गाढे यांने घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दुपारी ३ वाजेदरम्यान उघडकीस आली. यावेळी शेजरच्यानी तातडीने उतरवून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.







