ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचा आरोप

शिरसोली ता . जळगाव ( प्रतिनिधी ) ;-ग्रामपंचायतीमध्ये ३ कोटींची विकासकामे केल्याचा दावा विरोधकांनी केला असून मात्र त्यांनी ग्रामपंचायतीवर ५० लाखांच्या कर्जाचा डोंगर उभारला आहे . तसेच त्यांनी केलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी केला आहे . यात म्हटले आहे कि, तीन कोटीचे कामे केले असे विरोधक बोलत आहे. पण प्रत्यक्षात असे कामे आमदार व खासदार फंड व चौदावा वित्त आयोग , दलित वस्ती सुधार पंचाय समिती शेष फंड ,जिल्हा परिषद शेष फंड याच्या माध्यमातून विकास कामे केले जातात . पंरतु विरोधकांनी ग्रामपंचायतीवर 50 लाखाच्या कर्जाचा डोगंर ठेऊन काम निकृष्ट केली असल्याचा आरोप परिर्वतन ग्रामविकास पँनल कडून करण्यात आला आहे.
गावातील प्रत्येक वार्डात पक्क्या गटारी , आरोग्य शिबीर राबविणार असून अनेक विकासकामे राबविण्यात येणार आहे . गावाच्या सर्वांगीण विकासासाठी
उमेदवार सज्ज असून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे .







