जळगाव ;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात नागरिकांना पिण्याचे पाणी वाटप राष्ट्रवादीच्या वक्ता प्रशिक्षण विभागातर्फे आज वितरित करण्यात आले . यावेळी वक्ता प्रशिक्षण शहर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल , अभिषेक पाटील, जाकीर पिंजारी , अल्तमश खान ,मोसीन खाटीक , रशीद खान ,शकील पटेल, , आदी याप्रसंगी उपस्थित होते.


गेल्या १८ दिवसांपासून या परिसरात पिण्याचे पाणी येत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने राष्ट्रवादीतर्फे आज पाण्याचे टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात आले . अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्याचे टँकर पाहून सुखद धक्का बसला . त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले . यावेळी साहिल पटेल यांनी नागरिकांना मनपातर्फे मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे सांगत मनपाच्या कारभारावर टीका केली.







