जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील बिग बाजारच्या पार्किगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विजय पवन सोलंकी (वय-38, रा. इंद्रप्रस्थ नगर) हे बिग बाजारमधील पीव्हीआर येथे कामाला आहे. 17 मार्च रोजी त्यांनी सकाळी 10 वाजता बिग बाजाराच्या पार्किग झोनला लावली होती. सायंकाळी 8 वाजता घरी जाण्यासाठी दुचाकीकडे गेले असता दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी सर्वत्र दुचाकीची शोधाशोध सुरू केली मात्र मिळून आली नाही. शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.