• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आता लवकरच गायीच्या शेणापासून बनवलेलं “वैदिक पेंट” बाजारात दाखल होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच दरम्यान आता लवकरच गायीच्या शेणापासून बनवलेलं “वैदिक पेंट” बाजारात दाखल होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंबंधीची माहिती दिली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून वैदिक पेंटची निर्मिती केली जाणार आहे. ग्रामीण अर्थवस्थेला बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
“ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचं साधन मिळावं यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून लवकरच वैदिक पेंट बाजारात उपलब्ध केले जाणार आहे. वैदिक पेंट हे डिस्टेंपर आणि इमल्शन अशा दोन प्रकारात उपलब्ध होणार आहे. हे पेंट पर्यावरणपूरक, नॉन टॉक्सिक, अ‍ॅन्टी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आणि वॉशेबल आहे. घराला रंग दिल्यावर केवळ चार तासांत हे पेंट सुकणार आहे” अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.

“वैदिक पेंटमुळे पशूधन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात अंदाजे 55 हजार रूपयांची वाढ होऊ शकते” असं ही नितीन गडकरी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी वेदिक पेंटच्या डब्याचे काही फोटो देखील शेअर केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात खादी उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. वोकल फॉर लोकलचा नारा पंतप्रधानांनी दिल्यापासून सर्वत्र आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी वस्तू विकत घेण्याकडेही अनेकांचा कल वाढला आहे.

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांनी काही दिवसांपूर्वी गायीच्या शेणापासून तयार केलेली चिप लॉन्च केली होती. या चिपमुळे मोबाईलमधून पसरणारे रेडिएशन कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. “गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेली चिप तुम्ही मोबाईलमध्ये ठेवू शकता. यानंतर तुमच्या मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचं प्रमाण अतिशय कमी होतं. तुम्हाला आजारांपासून दूर राहायचं असल्यास ही चिप अतिशय प्रभावी ठरेल” असं कथिरिया यांनी सांगितलं होतं. या चिपला गौसत्व कवच असं नाव देण्यात आलं असून त्याची निर्मिती राजकोटमधील श्रीजी गौशाळेकडून केली जाते. राष्ट्रीय कामधेनू आयोग केंद्रीय मत्सोत्पादन, पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.


 

 

Previous Post

बोदवड तहसीलदारांसह मंडळाधिकारी व तलाठी लाच प्रकरणी एसीबीच्या ताब्यात

Next Post

व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक; सायबरला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक; सायबरला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले
Uncategorized

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत
Uncategorized

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले
क्राईम

ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले

July 31, 2026
पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका
Uncategorized

पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon