• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमदार रवी राणांवर यावरून संतापले विधानसभा अध्यक्ष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 15, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई, –  राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. त्यामुळे चर्चेला वादळातच सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडागंजी पाहायला मिळत आहे.

बडनेराचे आमदार रवी राणी गळ्यात संत्र्यांचा हार घालून विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवलं. गळ्यातील संत्र्यांचा हार काढल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

‘शेतकऱ्यांचं मरण, हेच राज्य सरकारचं धोरण. उद्धवा अजब तुझे सरकार’, असं लिहिलेलं बॅनरचा पोषाख परिधान करून आमदार रवी राणा यांनी सभागृहात प्रवेश केला. यावरून सभागृहात वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार रवी राणा यांच्या पोषाखावर आक्षेप घेत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. एवढंच नाही तर त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेशही दिले. मात्र, त्यानंतर आमदार रवी राणा यांना सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले आणि त्यांनी रवी राणा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. आता सत्ताधाऱ्यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी…

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार रवी राणा यांच्या पोषाखावर आक्षेप घेतल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. ते म्हणाले, रवी राणा यांचं वर्तन अयोग्य आहेत. मात्र, त्यांनी मांडलेल्या मुद्द्याबाबत आपण विचार करायला हवा. त्यानंतर फडणवीस यांनी रवी राणा यांना सभागृहाबाहेर जाऊन बॅनरचा पोषाख उतरवण्याची विनंती केली. तरी देखील सत्ताधारी आमदारांचा गोंधळ न थांबल्यानं विधानसभा अध्यक्षांनी उभं राहून, कडक आवाजात शांत राहण्याच्या सदस्यांना सूचना दिल्या.  दुसरीकडे, हक्कभंग सादर करण्यावरून भाजपने जोरदार आक्षेप घेतला. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणी चॅनलवरुन काही बोलत असेल तर तो राज्याचा अपमान आहे’ अशा शब्दांत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्यांना बजावले.

दरम्यान, महिला आणि बालकांच्या विरोधात होणाऱ्या अपराधांविरोधात राज्य सरकारनं शक्ती विधेयक मांडलं आहे. ते विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पण विरोधी पक्ष भाजपला मात्र हे विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठवून त्यावर अधिक चर्चा व्हावी, असा वाटत आहे. त्यासाठीचा प्रस्ताव विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील विधानसभेत मांडणार आहे.

कृषी कायदे संसदेत मंजूर घेताना पुरेशी चर्चा झाली नव्हती, असा आक्षेप घेण्यात येत आहे. त्याचाच आधार राज्यात शक्ती विधेयक मंजूर होणार का याची चर्चा आहे. तसंच याशिवाय इतरही काही विधेयके घाईघाईत मंजूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. याशिवाय 2020-2021 पुरवणी मागण्यांवरही आज चर्चा होणार आहे. विधान परिषदेत नवनिर्वाचीत सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे.


 

 

Previous Post

जळगावात एकाची गळफास घेवून आत्महत्या

Next Post

कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी, सभापतींना खुर्चीवरून खेचले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी, सभापतींना खुर्चीवरून खेचले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon