जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज गुरुवार दि. १० डिसेंबर रोजी जिल्ह्यात ४३ बाधितरूग्ण आढळून आले आहे. तर ४९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आज देखील आठ तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.


जळगाव शहर-२०, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-७, अमळनेर-३, चोपडा-०, भडगाव-०, धरणगाव-०, पाचोरा-०, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-१, बोदवड-० असे एकुण ४३ रूग्ण बाधित आढळून आले आहे.
आज गुरुवार दि. १० डिसेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार ५९१ रूग्ण बाधित आढळले आहे. त्यापैकी ४०५ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे तर ५३ हजार २३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज भुसावळ तालुक्यातील दोन बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकुण १ हजार ३०९ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.







