• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव येथे वारकर्‍यांसाठी ’डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगाव येथे वारकर्‍यांसाठी ’डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

तीन दिंड्यांतील शेकडो वारकर्‍यांना  सेवाभावातून आरोग्याचा उपहार

चाळीसगाव (प्रतिनिधी) : आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात विठ्ठलनामाचा अखंड गजर करत पायी प्रवास करणार्‍या वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेत गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव यांच्या वतीने चाळीसगाव येथे मोफत फिजिओथेरपी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. सेवाभाव, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट प्रत्यय देणार्‍या या उपक्रमात तीन प्रमुख दिंड्यांमधील शेकडो वारकर्‍यांना मोफत आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली.
दरवर्षी हजारो वारकरी अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात. या दीर्घ प्रवासामुळे मान, पाठ, कंबर, गुडघे, पाय आणि सांध्यांमध्ये वेदना, स्नायूंचा ताण तसेच शारीरिक थकवा जाणवणे ही सामान्य बाब असते. हीच गरज ओळखून महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने वारकर्‍यांसाठी विशेष फिजिओथेरपी सेवा शिबिर आयोजित केले.शिबिरात वारकर्‍यांच्या शारीरिक तक्रारींचे सखोल मूल्यमापन करून आवश्यक त्या फिजिओथेरपी उपचारांद्वारे वेदना कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय स्नायू व सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम, ताकद वाढविणारे व्यायाम, योग्य शरीरस्थिती राखण्याचे मार्गदर्शन तसेच पुढील प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी आवश्यक आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. अनेक वारकर्‍यांनी उपचारानंतर वेदना कमी झाल्याची भावना व्यक्त करत डॉक्टरांच्या सेवाभावाचे कौतुक केले.या सेवा शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. मनोज सूर्यवंशी यांनी नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. उत्कर्ष भोळे, डॉ. सलोनी किर, डॉ. नयन शेटे आणि डॉ. सृष्टी तभाणे यांनी अत्यंत समर्पित भावनेने वारकर्‍यांची सेवा केली. प्रत्येक वारकर्‍याला आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन मिळावे यासाठी डॉक्टरांच्या पथकाने दिवसभर अविरत कार्य केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा

Next Post

हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा संताप
खान्देश

नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा संताप

October 15, 2026
भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत
क्राईम

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

October 15, 2026
जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश
क्राईम

जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

October 15, 2026
शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
क्राईम

शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा संताप

नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा संताप

October 15, 2026
भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

October 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon