मुंबई (वृत्तसंथा) – महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पूूरग्रस्त गाव खिदरापूरला सलमान खान आणि गुरुग्रामच्या एलान फाउंडेशनने दत्तक घेतले आहे. 2019 मध्ये आलेल्या पुरात कोल्हापूर जिल्ह्यात बरेच नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना आश्रय आणि घरे बांधून देण्यासाठी बॉलिवूड स्टार आणि एलान फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. ते त्यांना पक्के घर बांधून देणार आहेत.
याविषयी एनजीओचे रवीश कपूर म्हणाले,’एक जबाबदार संघटना म्हणून आम्ही काम करत आहोत. ग्रामीण भारतात एक सकारात्मक बदलाची सुरुवात करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. संपूर्ण समाजाच्या विकासासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. यासाठी सलमान खानदेखील आमच्यासोबत काम करत आहे. ते आमच्यासोबत जोडले गेले याचा आम्हाला आनंद आहे.
यादरम्यान सलमाननेदेखील टि्वटर आणि इंस्टावर एनजीओसोबत काम करत असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, ‘माझे मन त्या लोकांसाठी दु:खी आहे, ज्यांनी 2019 च्या पुरामध्ये आपल्या कुटुंबीयांना गमावले. त्यांच्या घराचे नुकसान झाले. अशा लोकांना आम्ही मदत करू.