लंडन (वृत्तसंथा) – इंग्लंडमध्ये बुधवारपासून पाऊस आणि हिमवृष्टीचा नवा हंगाम सुरू झाला. फेब्रुवारीच्या सुरुवातीला एका आठवड्यातच आलेल्या सिआरा आणि डेनिस वादळातून इंग्लंड बाहेर निघाला नसतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या वादळांमुळे इंग्लंडमध्ये फेब्रुवारीत सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. तिकडे नॉटिंगहॅम, डर्बीशायर, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमध्ये हिमवर्षाव झाला. यात ५ इंचांपर्यंत बर्फ पडला. काही भागात बर्फाचे वादळी आले. ग्रेटर मँचेस्टर, ब्रॅडफोर्ड आणि लीड्सवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. यामुळे रेल्वे व विमान सेवा बाधित झाली आहे. हवामान खात्याने हे वादळ लंडनकडे येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे लंडनमध्येही ४-५ इंच बर्फ पडण्याची शक्यता आहे. विभागप्रमुख पॉल गंुडरसन यांच्या माहितीनुसार उत्तर भाग, वेल्स, पूर्व स्कॉटलंडमध्ये पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, हिमवर्षाव, थंड हवा सुरू राहतील. अटलांटिकमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. जो दक्षिण-पश्चिमेकडे सरकरत आहे. मुसळधार पाऊस होईल.
अमेरिकेतील १३ राज्यांमध्ये हिमवर्षाव होत आहे. मिशिगन आणि पश्चिम न्यूयॉर्कमध्ये तर ८ इंचांपर्यंत बर्फ पडला. हिमवृष्टीमुळे झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले.
ब्रिटनच्या आयर्नब्रिजमध्ये सेव्हर्न नदीची पातळी वाढत चालली आहे. पाणी श्रोपशायर शहरात घुसले आहे. आयर्नब्रिजमध्ये फेब्रुवारीत २ इंच पाऊस पडला होता. येथे २४ तासांत २.४ इंच पाऊस पडला. हवामान विभागाने दहा दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे.
छायाचित्र सौदी अरेबियातील ताबुकचे आहे. येथे बर्फवृष्टीचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. या आधी जानेवारीतही येथे बर्फवृष्टी झाली होती.