जळगाव (प्रतिनिधी) – कीरकोळ कारणावरून मुलासह विवाहितेला चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कानळदा येथे शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील रजीया मजीद पिंजारी (वय-४५) व मुलगा फारूखसह राहतात. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मुलगा फारूख पिंजारी यांने गावातील रविंद्र पुरूषोत्तम उर्फ लिलाधर सपकाळे हा खून्नसने पाहत होता. माझ्याकडे खुन्नसने का बघतो असा जाब फारूखने विचारल्याने रविंद्रला राग आला. रविंद्र सपकाळे यांच्यासह पुरूषोत्तम बुधो सपकाळे, अंजनाबाई पुरूषोत्तम सपकाळे आणि नरेंद्र पुरूषोत्तम सपकाळे सर्व रा. कानळदा ता.जि.जळगाव यांनी शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. तर नरेंद्र सपकाळे यांना लोखंडी आसारीने फारूखच्या डोक्यात मारली. यात फारूख हा गंभीर जखमी झाला. हा प्रकार सुरू असतांना रजीया पिंजारी आवराआवर करण्यासाठी गेले असता त्यांनी चौघांनी बेदम मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. रजीया पिंजारी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि कदीर तडवी करीत आहे.







