• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकनाथराव खडसेंच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत रंगले नाराजीनाट्य !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 2, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) –  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे दीड महिन्यांनी पहिल्यांदाच जिल्हा कार्यालयात बैठकीनिमित्त आले. या पहिल्या बैठकीत खडसेंसमोरच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनाट्य रंगले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे छायाचित्र राष्ट्रवादीच्या बॅनरवरून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप करत डॉ. पाटील समर्थकांनी बैठकीत जाहीरपणे नाराजी व्यक्त करत, संबंधितांनी जाहीरपणे माफी मागावी म्हणून आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी बुधवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा प्रकार घडला. बैठकीला माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, मनीष जैन, दिलीप सोनवणे, अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, खडसेंच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अँड. रोहिणी खडसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गरुड, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील सरचिटणीस अँड.कुणाल पवार, युवक महानर अध्यक्ष स्वप्निन नेमाडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने एकनाथराव खडसे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पाटील हे बैठकीचे प्रास्ताविक करत असताना, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत पक्षाच्या बॅनरवरून डॉ. पाटील यांचे छायाचित्र जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप करत बैठकीत घोषणाबाजीला सुरुवात केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अँड. रवींद्र पाटील यांनी झालेल्या प्रकाराबाबत जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली. यापुढे अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही दिली. परंतु, त्यानंतरही डॉ. पाटील समर्थकांनी हा प्रकार करणाऱ्यांनी बैठकीत जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, म्हणून गोंधळ घातला. त्यावर जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी जाहीरपणे माफी मागत असल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकारावर पडदा पडला.

खानदेशामध्ये भाजपाचा विस्तार होण्याचे कारण एकच नेतृत्व आणि संघटितपणा असणे हे होते. त्यामुळे पक्षाचा विस्तार आणि विकास करण्यासाठी एकच नेतृत्व आणि संघटन असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज 2 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत केले.अहंमपणा, अहंकार जेव्हा येतो तेव्हा पक्षाचे वाटोळे होते. पक्षात जोपर्यंत संघटीतरित्या काम होत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. आगामी काळात होणार्‍या निवडणुकांसाठी तुटून पडा. नेता, कार्यकर्ता आणि नेतृत्व यांच्यात समन्वय असला पाहीजे. भाजपात एकच नेतृत्व होते म्हणून पक्ष वाढला. पक्ष विस्तारासाठी वातावरण निर्मीतीही आवश्यक आहे. येत्या १२ डिसेंबरला शरद पवारसाहेबांचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे असे आवाहनही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.

आम्हाला सांभाळून घ्या- अँड. रोहिणी खडसे

बैठकीत बोलताना अँड. रोहिणी खडसे म्हणाल्या की, आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापुढच्या काळात पक्ष संघटन वाढीसाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. आम्ही पक्षात नवीन आहोत, आमच्या हातून काही चुका घडू शकतात. त्यामुळे आम्हाला सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन अँड. खडसेंनी केले. पक्षात आमचे सर्वत्र जल्लोषात स्वागत झाले, याचा मनस्वी आनंद असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, नाथाभाऊ भाजपात असतांना एकही संस्था हाती लागू देत नव्हते. मात्र आता ते इकडे आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद आता दिसेल. जिल्ह्यात आधी सहा आमदार होते आता आठ आमदार निवडून येतील असा दावाही गुलाबराव देवकर यांनी केला.

बैठकीत जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांची जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी सांगितले की, नाथाभाऊंचा हात माझ्यावर होता म्हणून मी संचालक झालो. पण आता माझ्या मेव्हण्याला म्हणजे अ‍ॅड. रवींद्र पाटील यांना पदरात घ्या आणि आमदार करा असे सांगताच बैठकीत हास्याचे फवारे उडाले.

बैठकीचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार जि.प.सदस्य रवींद्र पाटील यांनी मानले.

 


 

 

Previous Post

जळगाव मुळजी जेठा महाविद्यालयात मेस्ट्रो राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन

Next Post

धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांचा दणदणीत विजय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांचा दणदणीत विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon