• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डोक्यात अवजड वस्तू मारून तलाठी पत्नीचा खून; निलंबित पोलीस पती गजाआड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2020
in क्राईम, जळगाव
0

पाचोरा पोलिसांच्या कसून तपासानंतर

पतीचा बनाव आला उघडकीस

आरोपी पती नितिन पवार

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील माहिजी येथील तलाठी असलेल्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या व पोलीस दलात असलेल्या पतीने तलाठी पत्नीचा अवजड वस्तु डोक्यात मारुन खून केल्याची घटना उघडकीस आले आहेत. दरम्यान पोलीस असणार्‍या तिच्या पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मयत अरुण पवार यांच्या आई मीराबाई परशुराम ठाकरे (वय-६०), रा. अष्टविनायक कॉलनी, भुसावळ फिर्याद दिली आहे. मयत पत्नीच्या पश्चात आई, एक अंध असलेला भाऊ आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, शहरातील मौर्या नगरमधील रहिवासी तथा तालुक्यातील माहेजी येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अरुणा नितीन पवार (वय – ४२) यांचे भाऊ हे मुंबई येथे पोलिस दलात सेवेत असतांना त्यांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. भावाच्या मृत्युबाबतचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी अरुणा ह्या मुंबई येथे गेल्या असता त्यांची भेट पोलिस दलात नोकरीस असलेले नितीन मोतीलाल पवार यांचेशी झाली. नितीन यांने अरुणा हिचा विश्‍वास संपादन करुन माझा पहिला विवाह झाला असुन माझी पत्नी माझ्यासोबत राहत नाही व मी पण आपल्या समाजाचा आहे असे खोटे सांगुन अरुणाला विवाहाची मागणी केली होती. यानंतर त्यांचा २२ सप्टेंबर २०१७ मध्ये विवाह झाला होता.

विवाहानंतर नितीन पवार हा नियमित अरुणा हिच्या चारित्र्यावर संशय घेत असुन तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत असे, अशी माहिती मिळाली. अरुणा हिने सदरचा प्रकार आपल्या आईस सांगितल्यानंतर आईने नितीन याच्या स्वभावात बदल होईल असे सांगितले. अरुणा ही तलाठी पदावर कार्यरत असल्यामुळे तिला तहसिल कार्यालयातुन कार्यालयीन कामकाजाबाबत व शेतकर्‍यांचे फोन येत असत. याचा नितीनला राग येवुन तिच्या चारित्र्यावरच संशय घेत असे. शेवटी याच विषयावरुन नितीन व अरुणामध्ये दि. २९ रोजी दुपारी दोनच्या सुमारास भांडण झाले. त्यात नितीन मोतीलाल पवार याने अवजड वस्तु डोक्यात मारुन पत्नीचा खुन केला.

पोलिस दलात असल्यामुळे नितीन याने पळवाट काढण्याचा प्रयत्न करत शेजारील नागरिकांना खोटी बतावणी करत अरुणा ही घरातील पायरी वरुन पाय घसरुन पडली व तिच्या डोक्याला जबर मार लागला आहे. असे सांगुन अरुणा हिस खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.

दरम्यान, पोलिसांनी नितीन यांच्याकडे कसून चौकशी केली. त्याने पत्नी अरुणा हिचा खून केल्याचे कबुल केले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळाची पाहणी केली असता, पतीचा जिन्यावरून पडल्याचा बनाव खोटा असल्याचे पोलिसांना दिसले. निरीक्षण केले असता, जिन्याला ३० पायऱ्या असून तेथून अरुणा पवार हि पडली असती तर, शरीराला सर्व बाजूने जखमा झाल्या असत्या मात्र, फक्त डोक्यात मार लागल्याचे दिसून आले. तसेच दवाखान्यात आणल्यावर ती मयत अवस्थेतच होती. असे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या लग्नलाला चार वर्ष झाले असून त्यांना मूल-बाळ नाही. संशयित आरोपी नितीन पवार हा मुंबई येथील नायगाव मुख्यालयात असतांना सातत्याने गैरहजर राहत असल्याने, त्याला निलंबित करण्यात आले आहे.
यावेळी पोलिस उपअधीक्षक ईश्‍वर कातकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, अजय मालचे, मुकुंद परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी घटना उघडकीस आणण्यासाठी पूर्ण परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

शालेय विद्यार्थ्यांनी घेतली व्हायोलिन मॅंटीस या दुर्मिळ किटकाची नोंद

Next Post

शिरसोलीच्या शेतकऱ्यांनी शेतात फिरविले रोटर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिरसोलीच्या शेतकऱ्यांनी शेतात फिरविले रोटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon