अमळनेर (प्रतिनिधी ) – येथे स्व.उदय वाघ यांच्या वर्षपूर्ती निमित्त झालेल्या शोक सभेस सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.त्यात भाजपा जिल्हा अध्यक्ष राजू मामा भोळे,माजी विधान परिषद आमदार सौ.स्मिता वाघ,माजी आमदार साहेबराव पाटील उपस्थीत होते त्यावेळी झालेल्या शोक सभेत अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी त्यांनी बर्याच आठवणींना उजाळा दिला.त्यात
जीवनात मनुष्य अनेक सप्न बाळगत असतो,त्याच पध्दतिने त्यांना नाव होती.कुणी त्यांना बापू
, कुणी रावसाहेब ,कुणी भाऊ म्हणायचे.ते सर्वानाच आपलस करायचे.आपलस करण्याचा त्यांच्यात गुण होता.राजकिय क्षेत्रात एकाच पक्षात पंचवीस वर्ष सोबत काम केल.अजात शत्रू.जीवनातल्या सर्व निवडणुका लढविल्या.

अमळनेर तालुक्यात कार्यकर्त्यांचे जाळ खूप छान पध्दतीत विणल.भा.ज.पा.ला जिल्ह्यात चांगल स्थान मिळवून दिल.पक्षाच हित आयुष्यभर जोपासल. खांद्याला खांदा लाऊन काम केल.स्वर्गीय बापूंच मी आधीच एकल नाही ते जर एकल असत तर मी कदाचीत २००९ ला च विधानसभेत आमदार असतो. ते मी तेव्हा एकल नाही त्याचा पश्चाताप आता होतो.अभाविप व संघा च काम त्यांनी अमळनेरात माझ्यासोबत केल.प्रगतीचे दिवस आले आणि बापू आपल्यातून निघून गेले.त्यांचे विचार आपण अंगीकारुन त्यांना अभिवादन करु.असे मत मांडले.
सर्व पक्ष्यांचे अध्यक्ष,उपा अध्यक्ष,सरचिटणीस उपस्थित होते.कार्यक्रमासाठी भाजपा अमळनेर टिम ने परिश्रम घेतले.







