आ.मंगेश चव्हाणसह लोकप्रतिनिधी,
पदाधिकाऱ्यांनी केले संविधानाचे वाचन
चाळीसगाव (प्रतिनिधी) – संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. चाळीसगाव येथे भारतीय जनता पक्ष व आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान पूजन व २६/११ मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, आरपीआय जिल्हाध्यक्ष नगरसेवक आनंद खरात, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, भाजपा अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील वानखेडे, नगरसेवक महेंद्र मोरे, माजी जि.प. सदस्य शेषराव पाटील, सरचिटणीस अमोल नानकर, चिटणीस विजय जाधव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, डॉ महेंद्र राठोड, किशोर रणधीर यांच्यासह जनसेवा कार्यालयातील जनसेवक व लाभार्थ्यांनी सामूहिक संविधानाचे वाचन केले.