पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा येथे आज दि,२३ सोमवार रोजी सकाळी न. पा. चौकात राज्य सरकारचा निषेध करीत भारतीय जनता पार्टीच्या वतिने विज बिलांची होळी करण्यात आली.
याबाबत अधिक असे कि पारोळा भाजपा कार्यकर्त्या च्या वतीने आज न,पा चौकात विज बिलाची होळी करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला, यावेळी पारोळा तालुका भाजपा उपाध्यक्ष विस्वास पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करित सांगितले की, नाकर्त्या राज्य सरकारने जनतेचा विश्वास घात केला आहे, आगोदर लाकडाॅऊन काळातील विज बिल माफ करण्याचे आश्वासन देत नंतर मात्र आपला शब्द फिरवित कोणतेही विज बिल माफ होणार नाही असे म्हणुन जनतेचा विश्वास घात केला म्हणुन पारोळा तालुका भाजपाच्यावतीने आज विज बिलांची होळी करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करित आहोत या वेळी धिरज महाजन यांनी आपले विचार व्यक्त करित सांगितले की, साधरण मार्च महिन्यापासुन राज्यात लाॅकडाऊन होते. ते हळुहळु आगस्ट महिन्या पासुन उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु मार्च ते जुलै महिन्या पर्यंत साधरण पाच महिने सर्वच व्यवहार ठप्प होते. कोणतेच उत्पनाचे क्षेत्र नव्हते म्हणुन भाजपाच्यावतीने या पाच महिण्याच्या कालावधीचे लाईट बिल माफ करावे म्हणुन राज्य भर आंदोलने करित आहोत. या राज्य सरकारने राज्यातील जनतेचा विश्वास घात केला असुन अनेक गरीब शेतकऱ्यांना व नागरिकांना कोणती रिडींग न घेता अव्वाच्यासव्वा लाईट बिले दिली आहेत. म्हणुन आज आम्ही राज्य सरकारचा निषेध व्यक्त करून या लाईट बिलांची होळी करित आहोत, यावेळी पारोळा भाजपाच्या वतीने राज्य सरकार विरोधी घोषणा देऊन आपला निषेध व्यक्त केला. या वेळी भाजपा पारोळा तालुका भाजपा उपाध्यक्ष विस्वास पाटील, सचिन गुजराथी,पारोळा तालुका व्यापारी आघाडी अध्यक्ष केशव क्षत्रिय,रंविद्र पाटील,धिरज महाजन, नरेंद्र राजपुत, विनोद हिंदुजा, अनिल टोळकर, गोपाल दाणेज, सुनिल भालेराव, समिर वैद्य, संकेत दाणेज, शाम पाटील, गणेश क्षत्रिय, भिकन पाटील, नरेंद्र साळी, कैलास चौधरी, गोटु वाणी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाचे लाँकडाऊन काळातील वीजबिल माफी करण्यासाठी वीजबिल होळी आंदोलन
पारोळा येथे वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या ऊर्जा मंत्री यांनी स्वतः सांगितले की, वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती बिले भरावीच लागतील तसेच दुसरीकडे महावितरण सक्तीने विजबील वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वास घात केला आहे. म्हणून भाजपाकडून विजबील होळी करण्यात आली व शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सदर आंदोलनात माजी तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील माजी तालुका सरचिटणीस धिरज महाजन तालुका सरचिटणीस सचिन गुजराती, समाधान पाटील, गणेश पाटील, नरेंद्र राजपूत, अनिल शेठ टोळकर, गोपाल शेठ दाणेज, समीर वैद्य, नरेंद्र साळी, केशव क्षत्रिय, विनोद शेठ हिंदुजा, कैलास चौधरी, अमोल दाणेज, संकेत दाणेज, विश्वास पाटील, गणेश क्षत्रिय, विरेंद्र सरदार, अनील वाणी, सुनील शिरसमणीकर, सुनील सोनार, शाम पाटील, धनंजय पाटील, गोटू वाणी, एकनाथ जाधव, अशोक ललवाणी, दिलीप सोनार, भिकन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







