छत्तीसगड (वृत्तसंस्था) – छत्तीसगडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेचे दोन तरुणांसोबत विवाहबाह्य संबंध होते. तेव्हा पतीने दुसर्या प्रियकरासोबत मिळून पहिल्या प्रियकराचा काटा काढला आहे. या प्रकरणी पती पत्नी आणि पत्नीच्या प्रियकरला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भानू प्रताप राजवाडे यांच्या पत्नीचे शंकरसोबत गेली 3-4 वर्षे विवाहबाह्य संबंध होते. नंतर शंकरने आपला मोबाईल मित्र संजय रवीला दिला. तेव्हा संजयने राजवाडे यांच्या पत्नीशी फोनवरून संपर्क साधला आणि मैत्री केली. तेव्हा मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि राजवाडे यांच्या पत्नीचे संजय रवीसोबत विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाले.
15 ऑक्टोबर रोजी संजय आणि शंकर दारूच्या नशेत राजवाडे यांच्या घरी गेले. तेव्हा चौघांनी मिळून भरपूर दारू प्यायली. तेव्हा इतर तिघांनी मिळून शंकरच्या डोक्यावर लाठ्या काठ्यांनी मारहाण करून त्याचा खून केला. पोलिसांनी संखोल तपास करून तिघांना अटक केली आहे.







