• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शरीरास घातक औषधांवर नियंत्रण आणण्याची जळगावातील विविध संस्थांची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरासह संपूर्ण देशात खेळ संकृती वाढत असून यात जिमचे महत्व वाढीस लागत आहे. या जिममध्ये शरीर पिळदार करण्यासाठी काही युवक यंत्राच्या सहाय्याने व्यायामासोबत काही औषधे घेत असतात अशी औषधे शरीरास घातक असून यांच्यावर सरकारने नियंत्रण आणावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिममध्ये यंत्रांच्या साह्याने व्यायाम करून व त्यासोबत काही औषधे घेऊन व सल्ला यानुसार अनेक युवकांचे जीवन संकटात आले आहे. या औषधांमुळे शरीर अधिक पिळदार होते. परंतु, त्यांचे दुष्परिणाम इतके भयंकर असतात की माणसाला जीवनातून उठविण्याचे प्रकार घडतात. बॉडी बिल्डिंग करण्याची मोठी फॅशन आहे. प्रत्येकाला आपले शरीर पिळदार हवे आहे. त्यासाठी ते लोक काहीही करायला तयार असतात. कोणीही सांगितलेल्या सल्ला अमलात आणतात मग त्यामुळे शरीराचे कोणतेही भाग निकामी झाले तरी मागे पुढे पाहिले जात नाही. मागील वर्षी मुंबईतील एका तरुणास त्याच्या आईने किडनी देऊन वाचवले होते. कारण त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. कारण त्याने शरीर पिळदार बनविण्यासाठी कृत्रिम पोषक आहार घेतात. औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले पाहिजे. शरीरावर होणारे परिणाम यांची प्रत्येकाला माहिती असले पाहिजे. संपूर्ण जीम व फिटनेस सेंटर चालणाऱ्या तसेच घातक औषधी यांच्यावर सरकारचे नियंत्रण असावे. तसेच प्रत्येक ट्रेनर हा विशिष्ट ट्रेनिंग घेतलेला असावा जेणेकरून असे तरुणाची नुकसान होणार नाही. तरुण या प्रकाराने आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा करत आहेत. त्यास आळा घालण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. शहरासह राज्यात देशपातळीवरील सरकार यांनी याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर कादरिया फाउंडेशनचे फारुख कादरी, लोकसंघर्ष मोर्चा सचिन धांडे, अमन एज्युकेशन सोसायटीचे शहीद सय्यद, जावेद शाह बिल्डर, एनोद्दिन शेख आदींची स्वाक्षरी आहे.


 

 

Previous Post

शेतकरीच खरा जगाचा पोशिंदा

Next Post

जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला अचानक पेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला अचानक पेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका
1xbet russia

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026
शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल
1xbet russia

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon