चोपडा (प्रतिनिधी) – श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा, संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाला व गो अनुसंधान संस्था चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने संताजी जगनाडे महाराज यांचे मंदिरावर चोपडा श्रीराम नगर येथे दि . 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता विभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र रायसिंग. तालुका काँग्रेस अध्यक्ष राजाराम पाटील, तेली समाज अध्यक्ष श्री के. डी. चौधरी, ऊपाध्यक्ष श्री टी. एम. चौधरी यांच्या ऊपस्थितीत संपन्न झाला. सुरवातीला संताजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हलाची पूजा करण्यात आली.

यावेळी टी . एम. चौधरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी श्रीराम झुलाल मिस्तरी , अशोक भाईदास पाटील, लक्ष्मण भरवाड, ऊत्तम धोंडू चौधरी या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. धनराज प्रल्हाद मराठे, रामचंद्र आनंदा चौधरी, रवींद्र हिरामण पाटील, हिरामण पीतांबर पाटील या जवानांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रकाश श्रावण चौधरी, घनश्याम बाबुराव पाठक, रघुनाथ त्र्यंबक चौधरी, प्रशांत सुभाष चौधरी ,निवृत्त कर्मचारी ,शेतमजुरांचा व कोरोना पुरस्कार प्राप्तांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विभागीय पोलीस ऊपअधिकारी श्री रायसिंग यांचे शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सांगितले की, शेतकरी , शेतमजूर, जवान, आरोग्य कर्मचारी, पोलीस हे खरे योद्धा आहेत. सारे जग बंद असताना शेतकरी शेतात राबत होता. शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना खूप मान सम्मान दिला पाहिजे. ते काम या समाजाने केले.
अतिशय स्तुत्य असा ऊपक्रम असल्याचे नमूद केले. यावेळी रायसिंग यांनी स्वरचित शेतकरी जीवनावर आधारित कविता सादर केल्या. ऊपस्थितीतांना या कविता फारच भावल्या . यावेळी के . डी. चौधरी, राजाराम पाटील , टी. एम. चौधरी यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची ऊपस्थिती लाभली. किरण आनंदा चौधरी यांनी आभार मानले. भिका चौधरी, प्राचार्य ए . एल. चौधरी , गोपीचंद चौधरी, गुलाब चौधरी, प्रशांत चौधरी, राजेंद्र चौधरी, लक्ष्मण चौधरी, नंदू चौधरी, नारायण पंडित चौधरी, छोटू राघो चौधरी, महेंद्र चौधरी, रविंद्र चौधरी, ईश्वर गोविंदा चौधरी, अनिल चौधरी, गोरख चौधरी, देवकांत के. चौधरी, सूर्यकांत के. चौधरी, जगदीश मिस्तरी, जितेंद्र चौधरी, सरला चौधरी, कल्पना चौधरी, विमलबाई चौधरी, कमलाबाई चौधरी, सुरेखा पाटील, सिंधूबाई चौधरी, मीनाताई, चंद्रकला चौधरी , संध्याबाई चौधरी , विश्वासराव पाटील गुरूजी, गौरव अशोक पाटील, राहुल मिस्तरी आदी अनेकांची ऊपस्थिती लक्षणीय होती.







