जळगाव (प्रतिनिधी) – येथील गांधी रिसर्च फाऊण्डेशन चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून जैन हिल्स येथे गांधी तीर्थ म्युझियम पर्यटक व गांधी विचार अभ्यासकांसाठी उभारण्यात आले. आतापर्यंत 5 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी गांधी तीर्थ स्थळास भेट दिली आहे, या वर्षी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याकारणाने गेल्या मार्च महिन्यापासून हे म्युझियम खरबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता ते अनलॉकच्या अखत्यारीत येत्या 16 नोव्हेंबर पासून ‘गांधीतीर्थ’ म्युझियम शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून सुरू करण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टिने सर्वप्रकारचे प्रावधान करण्यात आले आहे. राज्य सरकार द्वारे देण्यात आलेल्या निर्देशानुसार सर्व नियमावली अंमलात आणून भेटी देणाऱ्या पर्यटकांची आरोग्य तपासणी करून प्रवेश दिला जाईल. गांधीतीर्थ मध्ये पूर्वीपेक्षा यंदा नवीन गॅलरी व अजून इतर नाविन्यता पाहण्यास मिळेल. तरी ईच्छुकांनी गांधीतीर्थला भेट देण्यासाठी बुकिंग केल्यास सोयीचे होईल. तरी खालील नंबरवर संपर्क साधावे अशी माहिती गांधीतीर्थच्या व्यवस्थापकांकडून देण्यात आली आहे. गांधीतीर्थ म्युझियम, जैन हिल्स, जळगाव. संपर्क – 9404955300 / 0257-2264803

खबरदारी म्हणून केलेल्या उपाययोजना –
1) सोशल डिस्टन्सिंगसह ऑडिओ गाईडेज टूर
2) थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सीमीटर द्वारे तपासणी
3) गरजेनुसार ठराविक ठिकाणी सॅनिटायझेनची व्यवस्था
4) खादीचे मास्क विक्रीस उपलब्ध
5) कॅशलेस व्यवहाराची सुविधा







