जळगाव (प्रतिनिधी) – येथील वाघनगर परिसरातील जिजाऊ नगरातील रहिवासी एका 37 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना दि.14 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जिजाऊ नगरातील रहिवासी सुरज शंकर बागडे (वय 37) याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, आई असा परिवार आहे.त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला आहे.आत्महत्या का केली अजूनपर्यत कारण स्पष्ट झाले नाही.
उद्या अंत्ययात्रा
सुरज बागडे यांची अंत्ययात्रा उद्या दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वाजता जाखनीनगर, कंजरवाडा येथून निघणार आहे.








