जळगाव (प्रतिनिधी) – माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याच्या खून प्रकरणातील चारही संशयित आरोपींची आज न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे.

गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर), विशाल संजय सपकाळे (रा.राजाराम नगर), रुपेश संजय सपकाळे (रा.कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर या चार संशयितांची नावे आहे.
राकेश सपकाळे याचा ४ नोव्हेंबर रोजी खून झाला होता. त्यात या चौघांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने चौघांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने चौघांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चौघांना पुन्हा १२ नोव्हेंबरपर्यंत दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलीस तापासात संशयितांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू काढून दिला आहे. तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा करीत आहे.







