नाशिक (वृत्तसंस्था) – वाहन उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठी व शहरातील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कामगारांना ५० हजार ते एक लाख दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सरचिटणीस सोपान शहाणे यांनी दिली.


यंदा कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. आटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचे वातावरण कोरोना काळात घटलेले उत्पादन ,कमी मागणी असतानाही असला तरीही महिंद्रा कंपनी व्यवस्थापण यांनी युनियन पदाधिकाराऱ्यांसोबत सकारात्मक निर्णय घेत जम्बो बोनस जाहीर केला आहे. किमान सेवाजेष्ठतेनुसार ५० हजार ते १ लाख बोनस २२००कामगारांना मिळणार असल्याचे महिंद्रा युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण व सरचिटणीस सोपान शहाणे यांनी सांगितले. याच बरोबर पुढील वर्षात मिळणाऱ्या बोनस बद्दल ही फायनल चर्चा झाली असून तो या वर्षीच्या बोनस पेक्षा जास्त असणार आहे. कामगारांना या बोनस ने पगाराबरोबर दीड ते दोन लाख मिळणार असल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.तर मंदिने ग्रासलेल्या नाशिक व्यापारी वर्गात ही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीला युनियनचे सरचिटणीस सोपान शहाणे, योगेश चव्हाण अध्यक्ष, राजेंद्र पवारउपाध्यक्ष, सचिव परशुराम कानकेकर, सहसचिव लॉरेन्स भंडारी, सदस्य सुनील अवसरकर व भुवणेश्वर पोई उपस्थित होते.







